आनंदी विद्यालयामध्ये मध्ये दिंडी सोहळा संपन्न

15 जुलै 2024 रोजी आनंद विद्यालय मध्ये आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न या दिंडी सोहळा मध्ये दिंडीचे पूजन करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन डी आदलिंगे सरानी दिंडीचे पूजन केले सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ चैत्राली मराठी मॅडम याने अश्वांचे पूजन केले या वेळेस व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बनकर एम एच व श्री ढोले एस एस श्री बाबर एम ए श्री तंडे एम पी श्री चंदनशिवे के पी सौ नवले मनीषा मॅडम सौ अनिता गाडेकर मॅडम व बीएडचा सर्व स्टाफ हजर होता.
हरिमानाच्या जयघोषात दिंडीला सुरुवात झाली यावेळेस रस्त्याच्या दोन तर्फाला वारकरी वेशातील विद्यार्थी उभ्या करून विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन अश्वांसह वैष्णवजनांनी गोल रिंगणाचा सोहळा अनुभवला. यावेळेस रिंगण सोहळा बघण्यासाठी सिंहगड कॅम्पस मधले सर्व कर्मचारी कमलापूर गावातील गावकरी हजर होते
ही दिंडी कमलापूर गावात पायी पायी चालत जात मारुतीच्या मंदिरामध्ये सर्व विद्यार्थी पालखी कमलापूर गावातील मंदिरामध्ये विसाव्याला यावेळेस प्रशालेची विद्यार्थिनी विठ्ठल झालेली सोनाली केसकर व रुक्मिणी झालेली कल्याणी देवकते यांना मंदिरात उभा करून त्यांच्यासमोर भजन चालू केले यावेळेस आनंद विद्यालयाच्या श्रावणी भैरू गोडसे व राधिका भैरव गोडसे यांनी हार्मोनियम वाजवून अभंग म्हटले त्यांना साथ देण्यासाठी टाळ मृदुंगासहित विद्यार्थीनी सर्व शिक्षक उस्फूर्तपणे साथ दिली. दिंडीमध्ये आमच्या प्रशालेचे विद्यार्थिनी विद्यार्थी फुगडी खेळण्याचा आनंदाने लुटला सर्व दिंडी हरिनामाचा गजर करत करत प्रशाला मध्ये पोहोचली व दिंडीची सांगता झाली.
या दिंडीचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्री बनकर एम एच व श्री ढोले एस एस व इयत्ता 10 वी मधील विध्यार्थीनी व सौ नवले मनीषा सौ अनिता गाडेकर रांगोळी काढण्याचे नियोजन केले .