जुनोनी विद्यालयाच्या वतीने रंगला दिंडी सोहळा..

कोळा वार्ताहर:-सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील कैलास वाशी पांडुरंग महाराज यांच्या पावन भूमी वारकरी परंपरा जोपासणाऱ्या जुनोनी गावात जुनोनी विद्यालय जुनोनी यांनी भव्यदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते
या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता वारकरी पेशातील मुले मुली यांनी ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम यांचा गजर करत गावातील प्रमुख मार्गावरून भव्य दिंडी सोहळा पार पडला हातात भगवे ध्वज घेऊन विठ्ठल नामाच्या गजराने जुनोनी परिसर दुमदुमला होता
विठ्ठल आणि रुक्मिणीचे पोशाख परिधान केलेले विद्यार्थी आणि मुले मुली यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आले होते सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दिंडी सोहळा होता. शाळेतील भव्य पटांगणात फुगडी रिंगण सोहळा तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले होते शिक्षक कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
या दिंडी सोहळ्यास शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन या आनंदी सोहळ्यात सहभाग नोंदवून आनंद विद्यार्थ्या समवेत आनंद घेतला जुनोनी विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्याने आषाढी वारीचे दर्शन घडवले आहे यामुळे शाळेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa