विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा:-प्रा.श्री.प्रबुध्दचंद्र झपके

शालेय जीवनामध्ये चांगले यश मिळवून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे व विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर यांनी व्यक्त केले. सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमधील सन-२०२३-२४ मध्ये एस. एस. सी बोर्ड परीक्षेत सुयश प्राप्त करणारया विद्यार्थ्यांचा व इ.१२वी मध्ये घवघवीत यश संपादन करणारया विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक,पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर,यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पुढे बोलताना झपके सर म्हणाले की, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे अभिमानास्पद असून बाकी विद्यार्थ्यांनीही या यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन याहीपेक्षा उत्तुंग यश मिळवावे असे सांगितले.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये इ. १०वी त ९५टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारया विद्यार्थ्यांस सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रु. १०००/-व ट्रॉफी तसेच माजी मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे यांचेकडून ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारया विद्यार्थ्यांस रु. १०००/-असे एकूण दोन हजार रू. बक्षीस हे अनुक्रमे कु. सानिका विजयकुमार श्रीराम, सानिया वसंत फुले यांना देण्यात आले तसेच ९०टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारी कु. अन्वेषा माणिकराव जगदाळे, सानिका संतोष सुरवसे यांना१०००/-रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.तसेच इ. १२वीत यश संपादन करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थीनी तनुजा कैलास ढोले, आदिती राजेश गायकवाड,माजी विद्यार्थी इक्रम इरफान खतीब,सुषमा जयंत गंगणे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संगमेश्वर घोंगडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.