सांगोला येथील हरिभाऊ जगताप गुरूजी यांचे निधन

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान सांगोलाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, सेवानिवृत्त शिक्षक अरूण उर्फ हरिभाऊ जगताप गुरूजी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
हरिभाऊ जगताप गुरुजी यांना सोमवारी थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. मात्र गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सचिन जगताप यांचे ते वडील होत.
जगताप गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पिढ्या घडवल्या असून एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आपुलकी प्रतिष्ठानचे ते सुरुवातीपासून मार्गदर्शक होते. मोठ्या उत्साहाने ते आपुलकीच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होत असत. त्यांच्या जाण्याने आपुलकी प्रतिष्ठानमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवारी सकाळी ७.३० वाजता सांगोला येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.