स्व.वैशाली कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मातोश्री वृध्दाश्रमातील महिलांना साडी व किराणा मालाचे वाटप

सांगोला(प्रतिनिधी):-स्व.वैशाली विजय कांबळे (खडतरे) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सांगोला येथील मातोश्री वृध्दाश्रमातील महिलांना साडी वाटप व अन्नधान्य, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.नगराध्यक्ष अनिल खडतरे, समाधान सरगर, रेवातात्या सरगर व धर्मेश व जाधव सर उपस्थित होते.संस्थेचे संचालक श्री.जाधव सर यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.