सप्तम सोशल फाउंडेशन व फॅबटेक टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सांगोला ( प्रतिनिधी),:- सप्तम सोशल फाउंडेशन व फॅबटेक टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी करिअर दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिर दिनांक 2 जुलै रविवार रोजी (सकाळी ठीक 10 वाजता) शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज समोर कडलास रोड सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर शितल कुमार रवंदळे( अध्यक्ष-महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, पुणे) हे उपस्थित राहणार असून डॉ. नितीन भोगे( मानसोपचार तज्ञ-
डॉ वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर), डॉ.माधव राऊळ ( ट्रेझरर:- महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स, पुणे) हे मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजक सप्तम सोशल फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये
१) दहावी बारावी डिप्लोमा नंतरच्या करिअर संधीसाठी मार्गदर्शन.
२) आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधी.
३) जलद गतीने बदलत्या काळानुसार उपलब्ध होणाऱ्या संधी व आव्हाने.
४) पालक विद्यार्थी व विविध महाविद्यालय प्रतिनिधी मध्ये संवाद.
५) परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी.
६) शैक्षणिक कर्ज प्रक्रिया मार्गदर्शन.
७) करिअर निवड आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थापन.
८) उत्तम कार्यासाठी आवश्यक कौशल्य.
९) महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त नामांकित अभियांत्रिकी वैद्यकीय व फार्मसी महाविद्यालयांचा सहभाग.
१०) चर्चासत्र पालक विद्यार्थी व प्रमुख वक्ते.
अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठीच्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून दहावी व बारावी पास विद्यार्थी व पालकांना या शिबिरासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी 9503103819 या क्रमांकावर विद्यार्थी व पालकांनी संपर्क करावा असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.