वाढेगांव प्रशालेची प्रबोधनपर जनजागृती दिंडी वृक्ष लागवडी बरोबर नवीन मतदार नोदणीचा दिंडीच्या माध्यमातून

सांगोला/प्रतिनिधी:: आषाढी वारीच्या निमित्ताने प पू उदयसिंहजी देशमुख प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय (वाढेगांव ता.सांगोला ) यांचेवतीने सोमवार दी १६ जुलै रोजी “विठ्ठल” नामाचा जागर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना “आषाढी” वारीचे दर्शन घडवित वृक्ष लागवडीचा व मतदान जनजागृती बरोबर नवीन मतदार नोंदणीचा संदेश दिला.
माण, अप्रूका व कोरडा संगम तीरावरील महादेवाच्या पावन भूमीत वसलेल्या वाढेगांव ता.सांगोला येथील प्रशाला व ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सवाद्य पालखी दिंडी काढली होती.दिंडीमध्ये बहुतांशी विद्यार्थी हे पारंपारिक वेश परिधान करून सहभागी झाले होते.टाळ मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाच्या नामाचा जागर करीत विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी, वृक्ष लागवडीचा संदेश देत जनजागृती केली.
यावेळी गावातील विठ्ठल मंदिरासमोर मुला मुलींनी विविध खेळ सादर करून सर्वांची मने जिंकली तर विठ्ठलाची आरती झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देवून दिंडीची सांगता करण्यात आली.यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भगात,बालाजी केदार,सौदागर दिघे,सुरेश पाटील,बापू लोकरे ,धानाजी ननवरे यांचे सह महिला व पुरुष पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.