किडबिसरी येथे मराठी शाळा व विद्यालयाच्या वतीने एकत्र वारकरी दिंडी सोहळा संपन्न..

सांगोला तालुक्यातील किडबिसरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा किडेबिसरी व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय किडेबिसरी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून प्रमुख मार्गावरून भव्यदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते
या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता वारकरी पेशातील मुले मुली यांनी ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम यांचा गजर करत गावातील सिद्धनाथ मंदिर परिसर ग्रामपंचायत कार्यालय या परिसरात भव्य दिंडी सोहळा पार पडला हातात भगवे ध्वज विठ्ठलाची पालखी घेऊन विठ्ठल नामाच्या गजराने किडबिसरी परिसर विठ्ठलाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता विठ्ठल आणि रुक्मिणीचे पोशाख परिधान केलेले विद्यार्थी आणि मुले मुली यांची मिरवणूक काढण्यात आले होते सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दिंडी सोहळा होता. शाळेतील भव्य पटांगणात फुगडी रिंगण सोहळा तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले होते
शिक्षक कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या दिंडी सोहळ्यास पत्रकार जगदीश कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा किडेबिसरीचे मुख्याध्यापक श्री.कांदे सर व श्री.हेरलगे सर आणि श्री भुये सर व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय किडेबिसरी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.एन्.एन्.घेरडे सर श्री.व्ही.जे.कोळेकर सर व श्री.देशमुख सर. आणि श्री.जे.बी.घेरडे सर श्री.एस्.बी घेरडे सर व सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा संयुक्त सहकार्याने आषाढी एकादशी निमित्ताने शालेय दिंडी सोहळा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला. दिंडी सोहळ्याने आषाढी वारीचे दर्शन घडवले आहे यामुळे शाळेचे कौतुक होत आहे.