सांगोला विद्यामंदिरच्या 5 कॅडेट्सची आय.जी.सी. फायरिंग कॉम्पिटिशन साठी निवड
2019 पासून सातत्याने आय.जी.सी.मध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला

सांगोला (वार्ताहर) दरवर्षी ऑल इंडिया थलसेना कॅम्पचे आयोजन दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यामध्ये केले जाते. त्यासाठी संपूर्ण भारतातून एनसीसी कॅडेट्स विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातून विविध ऍक्टिव्हिटीमध्ये कॅडेट्सची निवड केली जाते.महाराष्ट्र डायरेक्टरमध्ये पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, मुंबई 01, मुंबई 02, नागपूर असे एकूण सात ग्रुप आहेत. पुढील कॉम्पिटिशन ही अहमदनगर येथे या सर्व ग्रुप मधील निवडक एनसीसी कॅडेट्स मध्ये होणार असून त्यामध्ये 38 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे पाच कॅडेट्स इंटर ग्रुप कॉम्पिटिशन साठी रायफल शूटिंग मधून सिलेक्ट झालेले आहेत.
अनुक्रमे सार्जंट ऋतिक सराटे, कार्पोरल अविराज कदम, लान्स कार्पोरल प्रथमेश दिघे, तर जेडब्ल्यू मधून कार्पोरल सानिका वेंडोले व कॅडेट कोयल मोरे या पाच कॅडेट्सनी अतिशय चांगल्या पद्धतीने फायरिंग करून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा दबदबा पुन्हा एकदा पुणे ग्रुप मध्ये दाखवून दिला. पुणे ग्रुप ज्युनियर डिव्हिजन निवडलेल्या कॅडेट्सपैकी पाच कॅडेट्स सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आहेत. 2019 पासून सातत्याने सहा वर्ष सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे कॅडेट आय.जी.सी. मध्ये आपली गुणवत्ता दाखवत आहेत तर सलग दोन वर्षे विद्यामंदिरच्या कॅडेट्सनी दिल्ली येथील ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये बाजी मारली आहे.
या सर्व एनसीसी कॅडेट्सना रायफल शूटिंगचे ट्रेनिंग ए.एन.ओ. सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी व थर्ड ऑफिसर सौ.उज्वला कुंभार यांच्याकडून मिळाले.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव म.शं.घोंगडे सर,खजिनदार शं.बा.सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके , कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद , मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांनी केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.