दिपकआबांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात दररोज मिळतोय शेकडो नागरिकांना न्याय ; दौऱ्याची लोकप्रियता आणि प्रतिसाद वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील सांगोला तालुक्यातील गाव खेड्यात आणि वाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात ग्रामीण भागातील शेकडो गरजू नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी सध्या दिपकआबा प्रयत्नशील आहेत. मंगळवार दि 16 रोजी आपल्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यात त्यांनी शिवने, वाकी, हलदहिवडी, शिरभावी आणि संगेवाडी या गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली व गावकऱ्यांशी संवाद साधला.
गावभेट दौऱ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि १६ जुलै रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवणे येथील माळीवस्ती, घाडगेवस्ती, शिवणे गावभाग तसेच खरातवाडी वाकी (शि) येथील नरळेवाडी, पाटीलमळा तसेच गावभाग तर हलदहिवडी येथील चव्हाण बोडरे वस्ती, गावभाग, महादेव चव्हाणवस्ती तसेच पाटीलवस्ती तर शिरभावी येथील गावभाग, ताटेमळा, माने घोरपडे मळा, मेटकरी नलवडेवाडी तसेच चिखले मुलानी वस्ती तर संगेवाडी येथील कदम भुसे वस्ती, खंडागळे वस्ती, पवारवस्ती, गावभाग, रणदिवेवस्ती, वाघमारेवस्ती, नृसिंह मंदिर परिसर, नवीन वसाहत, कांबळे वस्ती, पवार शिंदे वस्ती या वाड्यावर राहणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
थेट जनतेत मिसळून सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा हा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुरू आहे. गावभेट दौऱ्याच्या चौथ्या दिवशी नागरिकांनी त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या महसूल, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण तसेच पोलीस प्रशासनाविषयी असलेल्या अडचणींचा पाढाच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासमोर वाचून दाखवला. यावेळी दिपकआबांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष लोकासमोरच दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या रूपाने प्रथमच सांगोला तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी केवळ आपल्या कार्यालयातून जनतेशी संवाद न साधता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि त्यांच्या वाड्यावर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहे. दिपकआबांच्या या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने गावखेड्यात आणि वाडी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या असंख्य अडचणी सुटत असल्याने आबांच्या गाव भेट आणि जनसंवाद दौऱ्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
असा नेताच आम्ही आजवर पहिला नाही…!
गावखेड्यात आणि वाडीवस्तीवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा आणि कोण कुठल्या पक्षाचा विचारांचा याचा विचार न करता आणि कोणतीही राजकीय अभिलाषा न करता प्रत्यक्ष जागेवरूनच नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करून लोकांचे प्रश्न सोडविणारा दिपकआबा सारखा दुसरा नेता आपण पाहिलं नसल्याची चर्चा आबांच्या गाव भेट दौऱ्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांत सुरू आहे.