politicalmaharashtra

ठाकरेंचं ठरलं! मुंबईतल्या कोणत्या जागा लढणार? यादी आली समोर

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागा लढायच्या हेही ठरवले आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकीत तसा ठराव ठेवून त्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही राहाणार आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला असलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागा लढायच्या हेही ठरवले आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकीत तसा ठराव ठेवून त्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही राहाणार आहे. मुंबईत कोणतीही तडजोड करायची नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत.

 

ठाकरेंनी कोणत्या जागांवर केला दावा

मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी 25 जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.  केवळ 11 जागा सोडण्याची मनस्थिती शिवसेना ठाकरे गटाची आहे. मुंबईतल्या जास्ती जास्त जागा शिवसेनाच लढेल असा आग्रह आहे. त्यानुसार 25 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यात शिवडी, भायखळा ,वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे,जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी, अंधेरी पूर्व ,कुर्ला, कलिना,दहिसर,गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व,विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली, मलबार हील, अणूशक्ती नगर, मानखुर्द  शिवाजीनगर मतदार संघाचा समावेश आहे.

 

मित्रपक्षांच्या मतदार संघावरही दावा

ठाकरेंनी काही मित्रपक्षांच्या मतदार संघावरही दावा केला आहे. त्यात चांदीवली, अणूशक्तीनगर, मानखुर्द शिवाजीनगर, चेंबूर , वांद्रे पूर्व या मतदार संघाचा समावेश आहे. चांदीवली मतदार संघ हा काँग्रेसचे जेष्ठ नेते नसिम खान यांचा मतदार संघ आहे. ते या मतदार संघातून मागिल वेळी केवळ 400 मतांनी पराभूत झाले होते. इथे शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी झाले. मात्र ते सध्या शिंदे गटात आहेत. मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून समाजवादी पार्टीचे अबू आझमी हे आमदार आहेत. तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचा आमदार आहे. तर अणूशक्तीनगर हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मतदार संघावरून वाद होण्याची शक्यता आहे.

 

तरूणांना संधी देण्याची ठाकरेंची रणनिती

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने  14 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यातले 6 आमदार हे शिंदेंना जावून मिळाले. तर 8 आमदारांनी ठाकरेंना साथ दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटात इच्छुकांची संख्या मोठी आहे. तरूणांना अधिक संधी देण्याचा ठाकरे गटाचा मानस आहे. वांद्रे पूर्व मतदार संघातून वरूण देसाई, तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवाय लोकसभा निडणुकीत ज्या मतदार संघात शिवसेनेला मताधिक्य होते त्या जागा पदरात पाडण्याची शिवसेनेची रणनिती आहे.

 

जागांची आदला-बदलीची शक्यता

लोकसभा निवडणुकीत काही जागांची आदला-बदली झाली होती. त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही जागांची आदला-बदली होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे, तिथे  शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती आहे. मुंबईत 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला होता

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!