आषाढी एकादशी निमित्त विद्यामंदिर हायस्कूल एखतपुरच्या बालचमुची पायी दिंडी

आषाढी एकादशी निमित्त निवृत्ती सेवा संघ संचलित विद्यामंदिर हायस्कूल एखतपुरच्या बालचमुनी पायी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी निवृत्ती सेवा संघाचे सचिव श्री प्रशांत चांदणे व सौ. शीला काकी चांदणे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना केळीचा प्रसाद देण्यात आला. या दिंडीत विठ्ठल रखुमाई ,तुकाराम ,ज्ञानेश्वर ,मीराबाई, समर्थ रामदास यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेपासून निघालेली ही दिंडी नवले नगर मधून एखतपुर गावाकडे गेली. गावामधील शिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी लेझीम व टाळनृत्य सादर केले .
एखतपूर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर माऊली इंगोले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष भाऊ इंगोले ,निवृत्ती सेवा संघाचे अध्यक्ष कृषी भूषण प्रभाकर काका चांदणे ,निवृत्ती सेवा संघाचे सदस्य रामभाऊ जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन व आरती करण्यात आले. या दिंडीत कुमारी काजल इंगोले या विद्यार्थिनीने अभंगाचे गायन केले.
सदर दिंडीची सांगता एखतपुर गावांमधील दत्त मंदिरात झाली ,यावेळी सुभाष भाऊ इंगोले ,मेटकरी भाऊसाहेब ,मोहन आवताडे सर ,जितेश कोळी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार सचिन उबाळे यांनी मानले. एखतपूर गावच्या ग्रामपंचायतीकडून सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.