धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विनाअनुदानित शाळा महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंगशाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना 2024-25 साठी प्रस्ताव करावेत.
उप सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक दि.19 जुलै 2024 अन्वये जिल्हास्तरावर सन 2024-2025 मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविणेसाठी जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागणी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बहुल असलेल्या जिल्ह्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुण देणेसाठी तसेच शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शासनमान्य शाळांना अनुदानासाठी पात्र असलेल्या संस्थानी अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय दि.7 ऑक्टोबर 2015/ व अल्पसंख्याक विकास विभाग, शासन परिपत्रक दि.8 ऑक्टो.2015 तील अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र संस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर, सह संचालक, व्यवसाय शिक्षण विभाग, सोलापूर व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या मार्फत परिपूर्ण प्रस्ताव दि.15 सप्टेंबर 2024 अखेर सायं. 05 वाजेपर्यत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर करावे.असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.