जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 22/7/24 ते 28/7/24 दरम्यान शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न झाला.
या सप्ताहा अंतर्गत दिनांक 22/7/24 रोजी अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती करण्यात आली
दिनांक 23/7/24 रोजी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस साजरा करण्यात आला
दिनांक 24/7/24 रोजी विविध खेळ घेऊन क्रिडा दिवस साजरा करण्यात आला
दिनांक 25/7/24 रोजी विविध कलागुण सादर करून सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला दिनांक 26/7/24 रोजी कौशल्य व डिजीटल उपक्रमांतर्गत माती काम कागदी मुखवटे तयार करणे आदी उपक्रम घेण्यात आले दिनांक 27/7/24 रोजी वृक्षलागवड व संवर्धन तसेच पाण्याविषयी जागरूकता आदी कार्यक्रम घेण्यात आला सप्ताहाच्या शेवटी दिनांक 28/7/24 रोजी रविवारी सर्व विद्यार्थ्यांना रूचकर जेवण देऊन समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला
सदर कार्यक्रमात मेडशिंगी येथील दानशूर शिक्षण प्रेमी श्री अतुल राऊत श्री युवराज राऊत श्री प्रदीप राऊत श्री संदीप इंगवले तसेच माता पालक गटाच्या सौ ज्योती युवराज राऊत सौ वृषाली राऊत आदी मान्यवर सहभागी झाले होते
सदरचा सप्ताह यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी परिश्रम घेतले तर मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी संपूर्ण सहकार्य केले व मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब विस्तार अधिकारी श्री अमोल भंडारी साहेब केंद्र प्रमुख श्री मठपती साहेब यांचे लाभले



