*वझरे येथील ह.भ.प. धोंडीराम यादव महाराज यांचे निधन

नाझरे प्रतिनिधी
वझरे ता. सांगोला येथील ह.भ.प. धोंडीराम यशवंत यादव महाराज यांचे शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 75 होते.
यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी वझरे येथे सोमवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता होईल असे नातेवाईकांनी सांगितले.