महाराष्ट्र

सांगोला लायन्स क्लबला उत्कृष्ट रक्तदान शिबीर आयोजन पुरस्कार

माजी प्रांतपाल मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे वाढदिवसानिमित्त सांगोला लायन्स क्लबकडून कायमचा प्रकल्प अंतर्गत दरवर्षी मानवतेच्या कल्याणासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यामध्ये दरवर्षी १००० पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतात हे कार्य प्रमाण मानून सांगोला लायन्स क्लबला रक्तदान शिबीर आयोजनासाठी प्रांत ३२३४ड१ उत्कृष्ट रक्तदान शिबीर आयोजन पुरस्कार क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांना सांगोला लायन्स पदग्रहण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल सुनील सुतार यांचे शुभहस्ते व माजी प्रांतपाल मार्गदर्शक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर,रिजन चेअरमन ला‌.ॲड श्रीनिवास कटकुर,झोन चेअरमन ला.सोमशेखर भोगडे यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्रांत३२३४ड१ ‘जयघोष’ या अवॉर्ड नाईट समारंभामध्ये प्रांतपाल ला.ॲड. एम. के .पाटील यांनी हा पुरस्कार घोषित केला होता

माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे मार्गदर्शनाखाली समाजाच्या अभ्युदयासाठी सांगोला लायन्स क्लबचे विविध प्रकारे कार्य सुरू आहे.त्यामध्ये मानवी मूल्ये व मानवाच्या गरजा जपण्याचे कार्य प्रयत्नपूर्वक केलेले आहे.आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने आखून दिलेल्या कार्यक्रमापैकी रक्तदान शिबिर,हृदयरोग तपासणी, वुमन मेनोपॉज, हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, मधुमेह तपासणी शिबिर, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, भुकेल्याला भोजन व युवकांना प्रेरित करण्यासाठीचे विविध कार्यक्रम प्रमाण मानून यापूर्वी सांगोला लायन्स क्लबचा नाशिक येथे संपन्न झालेल्या ३२३४ बहुप्रांत परिषदेमध्ये मानवतावादी गरजांच्या पूर्ततेसाठी हिरो अवार्ड’,अन्नदान सप्ताहासाठी रिजनमध्ये बेस्ट ऍक्टिव्हिटी सन्मान, तसेच क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांचा बेस्ट क्लब प्रेसिडेंट, बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट स्पीच क्लब ऑफिसर सन्मानाने सन्मान झाला आहे.

या यशाबद्दल सांगोला लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button