शिवणे माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

शिवणे वार्ताहर-शैक्षणिक वर्ष 2023-24मधील दुसरी शिक्षक पालक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यालयात पार पडली .
पालक सभेची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन रावसाहेब भाजनावळे यांनी केले.
त्यानंतर विद्यालयात घेण्यात येत असलेल्या शाळाबाह्य परीक्षा बाबत चर्चा झाली तसेच इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत चर्चा करण्यात आली .यामध्ये पालकामधून बाळासाहेब वाळके,प्रभाकर जाधव,तानाजी नलवडे यांनी आपली मते आणि सूचना मांडल्या त्याचबरोबर विद्यालयाच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले.
समारोपाच्या मनोगतात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी विद्यालयामार्फत विध्यार्थी प्रगतीसाठी कोणते उपक्रम राबविले जातात याविषयी सांगताना शिक्षक,पालक आणि विद्यार्थी हा त्रिकोण एकमेकांच्या सहकार्याने पुढे नेला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब भाजनावळे यांनी केले तर आभार प्रा.राजाभाऊ कोळवले यांनी मानले .चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.