महुद येथे चर्मकार समाजाचा वधू-वर पालक सुचक मेळावा व पुरस्कार प्रदान सोहळा

संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १०/१२/२०२३ रोजी सकाळी ११-००वाजता देवदत्त मंगल कार्यालय महुद येथे चर्मकार समाजाचा मोफत वधु वर व पालक सुचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे
.सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार असुन सदर मेळाव्याचे उद्घाटन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे..तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान परिषद सदस्य मा.दिपक (आबा) साळुंखे पाटील उपस्थित राहणार असुन सदर कार्यक्रमास .. भाऊसाहेब कांबळे,(संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार जन आंदोलन)भालचंद्र कांबळे(जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी सोलापूर) दत्तात्रय खडतरे(सोलापूर जिल्हा अध्यक्ष सहकारी संस्था),अनंत कुलकर्णी साहेब(पि.एसआय सांगोला) यांच्या सहित अनेक मांन्यवर उपस्थित राहणार आहेत
तसेच दादासाहेब रोहीदास कांबळे (निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर) व मा.गोपीनाथ ठोंबरे (उपजिल्हाधिकारी ठाणे) यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व समाजबांधवांनी आपल्या घरातील वधु वरांची सविस्तर माहिती संकलित करुन या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे अहवान संस्थेचे अध्यक्ष मा.गणेश बळीराम कांबळे यांनी केले…