सांगोलकरा भोवती धुक्याची चादर

निसर्गाची किमया काय असते,हे सध्या सांगोलावासिय अनुभवत आहेत.नेहमी दुष्काळी छायेत वावरणाऱ्या सांगोला वासियांना सध्या निसर्गाचे आगळे वेगळे चित्र पहावयास मिळतात आहे.नोव्हेंबर अखेर पर्यंत पावसाळी वातावरण व अवकाळी पाऊस अनुभवणाऱ्या सांगोला वासियांना सध्या गुलाबी थंडी व दाट धुक्याचा आनंद अनुभवण्यास मिळत आहे.
काल शुक्रवारची सकाळ धुक्याची दाट चादर लपेटुनच उजाडली.पहाटे पडणाऱ्या दवबिंदूमुळे शहवासीयांची वाहने ओलीचिंब झाली होती. दाट धुक्यामुळे दहा फूट लांबचे काहीच दिसत नव्हते.ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या वेळी शाल,स्वेटर घेऊनच बाहेर पडले होते.काही ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या.गुलाबी व हव्या हव्याशा वाटणाऱ्या थंडीत तरुणाई जॉगिंग साठी बाहेर पडली होती.
दाट धुक्यामुळे सकाळचे आठ वाजले तरी वाहने दिवे लावूनच सावकाश संथ गतीने पुढे जात होती. सांगोलकरना असे चित्र क्वचितच पहावयास मिळते.जे नागरिक घराबाहेर पडले त्यांना हा सुखद अनुभव घेता आला.इतरांनी मात्र सकाळीं उशिरा पर्यंत मऊ पांघरून घेऊन आराम करणे पसंत केले.