सांगोला महाविद्यालयात “ वसंतराव नाईक ” यांची जयंती साजरी

सांगोला/प्रतिनिधी:सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयामध्ये
01 जुलै 2024 रोजी “ वसंतराव नाईक ” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात
आली. महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते वसंतराव नाईक
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी वसंतराव नाईक
यांच्या विषयीची माहिती देताना वसंतराव नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी
व राजनितीज्ञ होते. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या पदावर सर्वाधिक काळ विराजमान
होते. वसंतराव नाईक यांना हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते.
सन १९७२ साली महाराष्ट्रातील दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी दूरगामी योजना
राबवल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधी क्रांतीकारी कार्य केल्याने नाईकांना
शेतकऱ्यांचा जाणता राजा व हरितयोद्धा असेही संबोधले जाते. त्यांच्या विचारांचे
आचरण प्रत्येकाने करावे असे मत व्यक्त् केले.
महाविदयालयातील या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एम.डी. वेदपाठक, अधिक्षक श्री.
प्रकाश शिंदे व श्री. बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.