सुर्योदय अर्बन पतसंस्थेची गगनभरारी; आर्थिक वर्षात संस्थेला 1 कोटी 60 रुपयांचा नफा
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात अल्पवधीतच नावलौकिक मिळविलेल्या सुर्योदय अर्बन पसंस्थेने 2023-24 या आर्थिक वर्षात मोठी गगनभरारी घेतली असून संस्थेस या वर्षी 1 कोटी 60 लाख 91 हजार 186 रुपये नफा मिळाला असल्याची माहिती संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.सुर्यादय अर्बन पतसंस्थेची जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी, डॉ.बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु आहे.
पतसंस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा यांचा नेहमीच गुणवत्तापूर्ण कार्यावर भर राहिलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या अनेक संस्थांचा विस्तार मोठ्या वेगाने होत असला तरी गुणवत्तेला बाधा पोहचणार नाही, याची दक्षता त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. म्हणूनच त्यांनी सुरु केलेल्या सर्व संस्था भक्कमपणे उभी आहेत. परंतु यासाठी त्यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमाला तोड नाही.
सुर्यादय अर्बन पतसंस्थेने कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेची 107 कोटी वार्षिक उलाढाल असून संस्थेचे शेअर्स भागभांडवल 2 कोटी 8 लाख 39 हजार 320 रुपये इतके आहे. संस्थेकडे 60 कोटी रुपयांच्या ठेव जमा असून संस्थेने आजपर्यंत 50 कोटींचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती चेअरमन पुजा इंगवले यांनी दिली.
संस्थेने सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, अधिकारी, मित्रपरिवार व हितचितक यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळविले असून स्थापनेपासून पतसंस्थेस अ वर्ग मिळाला असून 3500 सभासद आहेत. स्थापनेपासून सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येत असून संस्थेचा स्वनिधी 1 कोटी 85 लाख 98 हजार 803 इतका असल्याची माहिती व्यवस्थापक आण्णासो इंगवले यांनी दिली.