प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिरमध्ये सत्कार

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष व विद्यामंदिर परिवाराचे मार्गदर्शक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी नुकताच कुटुंबीयांसमवेत जपान दौरा यशस्वी केल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांचे हस्ते व उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी मनोज शशिकांत केदार याची सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले.