पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आमदार शहाजीबापूंची भेट
सांगोला (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना.चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
. राज्यात माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेत असून या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगोल्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगोल्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. ना.चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक बूथ सक्षम करून केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची मतदारांना माहिती द्यावी. सर्वांनी एकदिलाने काम करून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागावे असे आवाहन केले.
यावेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख जगदीश पाटील, संभाजी आलदर, भाजपचे मंडल अध्यक्ष अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, सुभाष इंगोले, समीर पाटील, प्रा संजय देशमुख, गजानन भाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्रदिवस कष्ट करून नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचे ध्येय उराशी बाळगून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदतनिधी देण्याचं वचन देतो. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत. – आमदार शहाजीबापू पाटील