उत्कर्ष विद्यालयात वासंतिक छंद वर्ग आणि उन्मेष छंद वर्गास प्रारंभ
सांगोला-विद्यार्थ्यांनी लवकर झोपले पाहिजे लवकर उठून सूर्याचं दर्शन घेऊन कोवळ्या उन्हाचा अनुभव घेतला पाहिजे व स्वतः मधील गुण स्वतः शोधाले पाहिजेत. बालवयात मस्ती ,मौज जरूर करावी पण त्याचा गैरवापर न करता व आपल्या मित्रातील चांगल्या गुणांचा स्वीकार करावा व आपल्या स्वतःच्या गुणांची देवाण-घेवाण करावी असे विचार माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कोषाध्यक्षा-डॉ.शालिनी कुलकर्णी यांनी व्यक्त केले .
उत्कर्ष विद्यालयातील वासंतिक छंद वर्ग व उन्मेश छंद वर्गाच्या उद्गाटन समारंभात त्या बोलत होत्या
त्याप्रसंगी व्यासपीठावर उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका – विश्रांती मागाडे मॅडम ,उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक- सुनील कुलकर्णी सर ,पर्यवेक्षक मुक्तानंद मिसाळ सर, भोसले सर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक- कुलकर्णी यानी वासंतिक वर्गामध्ये सुरू असलेल्या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी हजर राहून उपभोग घ्यावा असे मत मांडले .
सुरुवात दीपप्रज्वलाने व प्रतिमापूजनाने झाली.
प्रास्ताविकातून बनसोडे मॅडम यांनी वासंतिक छंद वर्गाचा हेतू कथन केला. या वासंतिक वर्गामध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या मुलांसाठी- छंद वर्ग , पाचवी व आठवी वर्गासाठी- स्कॉलरशिप, सहावी व सातवी साठी- संस्कृत प्रबोधन वर्ग व पाचवी ते आठवी वर्गांसाठी -चित्रकला वर्ग तसेच आयबीटी विभागामार्फत- पाककला हा विषय शिकवला जाणार आहे, तर खेळ विभागातून क्रिकेट ,आर्चरी या खेळांचे मार्गदर्शन अनुभवी मार्गदर्शकांच्या अधिपत्याखाली होणार आहे. या वर्गातून मुलांना अभ्यासाबरोबरच आपल्या इतर कलांचाही विकास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण सुकर व्हावे म्हणून स्पोकन इंग्रजी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आभार- वर्षा रस्ते मॅडम यांनी केले, वरील कार्यक्रमाचे नियोजन- प्राथमिक विभागाच्या- सुनीता नकाते मॅडम ,वर्षा रास्ते मॅडम व माध्यमिक विभागाच्या- सुवर्णा सपताळ मॅडम ,अनुराधा लिंगे मॅडम यांनी केले आहे.