धनगर समाज सेवा मंडळ सांगोलाच्या अध्यक्षपदी आकाश व्हटे
धनगर समाज सेवा मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न

सांगोला:- धनगर समाज सेवा मंडळ सांगोलाच्या नुतन अध्यक्षपदी आकाश व्हटे, उपाध्यक्षपदी अर्जुन जानकर, सचिवपदी बंडोपंत येडगे तर खजिनदारपदी राजाभाऊ मदने यांची निवड करण्यात आली.
दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी धनगर गल्ली येथील समाज मंदिरात बैठक संपन्न झाली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी समाज बांधव, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.