पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ; भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे आवाहन 

सांगोला (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. भारतामध्ये दोन लाखांहून अधिक प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना केंद्र सुरू झाली आहेत. २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान मधून देशभरातील योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे माढा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
        शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि कृषी सेवा पुरवणे हे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यामागे केंद्र सरकारचे मुख्य कारण आहे. बी-बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी गोष्टी योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. शेती उपयोगी गोष्टींबरोबरच शेतकरी शेती तज्ञांशी देखील संपर्क साधू शकतात. किसान समृद्धी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्यासपीठ आहे. इथे शेतकरी खरेदी-विक्रीसह विम्याचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण देखील करून देण्यात येईल. मातीच्या परीक्षणासोबतच शेतकऱ्यांना किसान समृद्धी केंद्रामध्ये तज्ञांचा सल्ला मिळवून देण्यात येण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
      पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे. खते, औषधे, किटकनाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. किटकनाशके, औषधे, बियाणे तसेच स्प्रेयर सारख्या वस्तू उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, कोणत्या पध्दतीने घ्यावीत यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे. कोणत्या बाजारपेठेत कोणत्या मालाल काय भाव आहे, पीक विमा योजना, हवामानाची माहिती, ड्रोन वापराची माहिती अशी वेगवेगळी माहिती या केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जाईल. शेती क्षेत्राशी संबंधीत वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, कृषी संशोधक, वैज्ञानिक यांच्याकडून विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जाईल. खताचा योग्य प्रमाणात वापर कसा व्हावा, पिकाच्या वाढीमध्ये कोणते पौष्टीक घटक आवश्यक असतात, पिकावर रोग पडल्याची लक्षणे, माती परिक्षणानुसार खत वापराचे नियोजन, सेंद्रीय खतांचा वापर आणि फायदा, जैविक खतांचे फायदे, नॅनो फर्टीलाईझर याबाबतची माहिती वैज्ञानिक, संशोधक आणि तज्ञांकडून विक्रेत्यांना दिली जाईल. सध्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आलेले आहे. २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान मधून देशभरातील योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे माढा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button