विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – विजय चौगुले

शिवसेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर, कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगोला तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी संघटना, ओबीसी सेल, एससी सेल पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत .नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी केले.

शिवसेना ओबीसी आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी शिवाजी घेरडे, महिला आघाडी तालुका प्रमुखपदी राणीताई माने, शिवसेना एससी आघाडी तालुका प्रमुखपदी दीपक ऐवळे, महिला आघाडी तालुका उपप्रमुखपदी दीपाली नलवडे, शिवसेना सोलापूर जिल्हा उपसंघटकपदी पांडुरंग मिसाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जगदीश पाटील, उपजिल्हा संघटक पांडुरंग मिसाळ, अशोक भालके, विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख, विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, तालुका संघटक युवराज पाटील, तालुका उपप्रमुख अरुण नागणे, तानाजी भोसले, सोमनाथ मरगर, बिरू आलदर, बाळकृष्ण सावंत, दादासो वाघमोडे, संतोष रोकडे, प्रभाकर चव्हाण, तालुका सहसंघटक तात्यासो पाटील, महादेव घोडके,दगडू बाबर, बाळासो भोसले, राहुल घोंगडे, तालुका समन्वयक संजय गायकवाड, नामदेव पाटील, सूर्यकांत सोळसे, भगवान कदम, नितीन चव्हाण, उदयसिंह घाडगे, युवराज भोसले, राजेंद्र पवार, रणसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना शहरप्रमुखपदी ज्ञानेश्वर तेली, शहर उपप्रमुखपदी सोमेश यावलकर, विजय इंगोले, सुनील धतींगे, अस्मिर तांबोळी, गणेश माळी, महेश कदम, शहर संघटकपदी आनंदा माने, शहर सहसंघटक अरुण पाटील, समन्वयक अरुण बिले, सहसमन्वयक अच्युत फुले, प्रसिद्धी प्रमुखपदी आनंद दौंडे यांची निवड करण्यात आली आहे. युवासेनेच्या शहरप्रमुखपदी समीर पाटील, युवासेना शहर उपप्रमुख सुजित भोकरे, आकाश घोंगडे, चैतन्य राऊत, अजय सुरवसे, काशिलिंग गाडेकर, सागर नरूटे, युवा संघटकपदी राजपाल चांडोले, युवा सहसंघटकपदी साहेबराव जाधव, युवा समन्वयक शंकर महादेव मेटकरी, युवा सहसमन्वयक अनिकेत महिमकर यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी छाया मेटकरी, महिला शहर उपप्रमुख अप्सरा ठोकळे, लतिका मोटे, मनीषा लिगाडे, रोहिणी बनसोडे, झाकीरा तांबोळी, महिला शहर संघटकपदी रुकसाना मुजावर, महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ओबीसी सेलच्या शहर प्रमुखपदी आयुब मुलाणी, ओबीसी सेल शहर उपप्रमुख नितिकेश तेली, प्रफुल्ल सादिगले, संग्राम सक्रे, गौरव काळे, दीपक पोरे, अशपाक मुलाणी, शेखर टेके, ओबीसी सेल शहर समन्वयकपदी तोहीद शेख, ओबीसी सेल शहर संघटकपदी प्रभाकर घोंगडे, ओबीसी सेल शहर सहसंघटकपदी निलेश म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.
शिवसेना एससी सेल शहर प्रमुखपदी कीर्तीपाल बनसोडे, एससी सेल शहर उपप्रमुख राजेंद्र बनसोडे, आनंद बनसोडे, नवज्योत ठोकळे, जितेंद्र चंदनशिवे, प्रशांत माळगे, एससी सेल शहर समन्वयक शरद रणदिवे, एससी सेल शहर सहसमन्वयक विनोद ढोबळे, एससी सेल शहर संघटक वैभव बनसोडे, एससी सेल शहर सहसंघटक अवि करडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button