लोकनृत्य स्पर्धेत लक्ष्मीदेवी सोनंद तालुक्यात द्वितीय….

कै.मा.आ. डाॅ. गणपतराव देशमुख यांच्या ९७ व्या जयंती निमित्त तालुकास्तरावर लोकनृत्य स्पर्धा सांगोला येथे आयोजित केल्या होत्या. सदर लोकनृत्य स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद येथील विद्यार्थीनींनी इ.९वी,१०वी गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कै.आ.गणपतराव देशमुख यांचे जयंतीदिनी नुकताच संपन्न झाला.
सदर समूह लोकनृत्य स्पर्धेत संजीवनी बोरगे,चैत्राली काळे,राधिका हाके,अंकिता भजनावळे,श्रावणी बाबर,धनश्री काशीद,संस्कृती शिंदे,अमृता शिंदे यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीला सर्वच विद्यार्थी व प्रेक्षक यांनी खूपच पसंती दिली.
सदर लोकनृत्य स्पर्धेसाठी सौ. अर्चना बाबर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा इंजि. बाबासाहेब भोसले, सचिव मा.आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ.अनिता भोसले, सौ. रजनी भोसले,प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षक श्री. सुभाष आसबे, सौ. सुषमा ढेबे तसेच सर्वच शिक्षक,सेवक स्टाफ यांनी वरील सर्वच कलाकारांचे अभिनंदन केले आहे.