*आमदार भाई जयंत पाटील व डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्यांना यश चारा छावणीची थकीत बिले लवकरच मिळणार*

*आमदार भाई जयंत पाटील व डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्यांना यश चारा छावणीची थकीत बिले लवकरच मिळणार*
सांगोला:- सांगोला तालुक्यातील१४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७लाख १४हजार ९२२ रुपयांच्या प्रलंबित बिले मंजूर होणार, अखेर शेकाप चे
नेते भाई जयंतरावजी पाटील यांच्या लक्ष वेधी मुळे व डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा…
सांगोला तालुक्यातील प्रलंबित चारा छावणीची बिले मिळावीत यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी वारंवार राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती..राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस असताना ते मंगळवेढा येथे आले असताना डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन चारा छावण्यांच्या प्रलंबीत बिले छावणी चालकांना मिळावीत आशी मागणी केली होती..तसेच सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेही मागणी केलेली होती तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार भेटुन थकीत बिलाबाबत विचारणा केली होती..तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस व आमदार भाई जयंत पाटील यांनाही चारा छावणीच्या थकीत बिलाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थीत करण्याची विनंती केली होती..सदर बिलाची सर्व कागदपत्रे पडताळुन आमदार भाई जयंत पाटील यांनी मंगळवारी दिनांक १/७/२०२४ रोजी विधीमंडळात थकीत चारा छावणीच्या बिलाबाबत लक्षवेधी मांडली या आगोदर ही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री.अनिल पाटील यांच्यासमवेत वेळोवेळी झालेल्या बैठकीनुसार आज पावसाळी अधिवेशनात सभागृहात ही प्रलंबित बिलासंदर्भात मागणी करून तो प्रश्न अखेर मार्गी लावला.
सन २०१८-१९ मध्ये सांगोला तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या १४६ चारा छावणी चालकांचे जवळपास २१ कोटी ४७लाख १४हजार ९२२ रुपये इतकी बीले शासनाकडे आज ही प्रलंबित आहे ते लवकर मिळावे यासाठी चारा छावणी चालकांसमवेत राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन भाई जयंत जी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आपण सदर छावणी चालकांचे बिल लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन दिले होते .गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचंबना होत आहे.
छावणी चालकांच्या या मागणीवर यापूर्वीही वेळोवेळी भाई जयंत जी पाटील साहेब यांनी सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनात तसेच पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून त्यांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून अदा करण्यात यावीत असे मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली होती..म़त्री महोदयांनी यास सकारात्मकता दर्शवत छावणी चालकांची थकीत बिले देण्याचा निर्णय घेत असल्याचे सभाग्रहात जाहिर केले मंत्री महोदयांनी जाहिर केले आसल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली…