संग्राम चौक गणेश मंडळाकडून रायचुरे यांना रसायनशास्त्रात पि.एच.डी मिळाल्याबद्दल सत्कार

नाझरे: डॉ.प्रमोद चंद्रकांत रायचुरे नाझरे येथील रहिवासी असून त्यांनी रसायनशास्त्र या विषयात पि.एच.डी मिळावल्याबद्दल त्यांचा संग्राम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तसेच नाझरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पि.एच.डी प्राप्त केल्यानंतर पुढील संशोधन करण्याकरिता आय आय टी मुंबई येथे त्यांची निवड देखील झाली आहे. सदर सत्कार प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष झाडबुक्के गुरुजी,भाजप चे नंदकुमार रायचुरे,नागेश रायचुरे, राष्ट्रवादीचे दादासो हरिहर,बंडू काकडे,शरद धोकटे सर, नंद कुमार रायचुरे, अनिल रायचुरे,घोडके डॉक्टर, विकास रायचुरे,शिवकुमार रायचुरे,पाटील तसेच मंडळातील इतर सदस्य उपस्थित होते यावेळी प्रशांत रायचुरे यांना भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या.



