माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी केले वृक्षारोपण

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला शहरातील जुने आरक्षण क्रमांक 46 बगीचासह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचा समतोल रहावा व निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी आनंदाभाऊ माने हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वाढदिवसानिमित्त शहरांमध्ये वृक्षा रोपण करतात. त्यांनी वाढदिवसानिमित्त लावलेली झाडे आज अनेकांना सावली देत आहेत. आनंदाभाऊ माने यांच्या निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाचे व उपक्रमाचे सांगोला शहर व तालुक्यात विशेष कौतुक केले जात आहे. यासाठी त्यांना मित्रपरिवाराचे विशेष सहकार्य लाभते .सोलापूर वन विभागात लेखापाल पदावर कार्यरत असणारे नरेंद्र दोडके यांनी आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता प्रतिष्ठान कार्यालयास 50 झाडे भेट देऊन निसर्गाप्रती असलेले आपले प्रेम व कर्तव्य व्यक्त केले आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमास राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला चे चेअरमन तायाप्पा माने, सोलापूर वन विभाग लेखापाल नरेंद्र दोडके ,ॲड. महादेव पारसे, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप जानकर, माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर, ज्ञानेश्वर गाडेकर, कुंडलीक गायकवाड ,सोहेल मुजावर, समाधान नरुटे ,ऋषि जानकर, अशपाक मुलाणी, अरुण कोळेकर, काशिलिंग गाडेकर, विनोद ढोबळे, शाहिद मुलाणी, सोमा चव्हाण, विशाल जानकर ,जय बनसोडे, तोहीद शेख, अब्बास पटेल, राजेंद्र उकिरडे, संतोष लवटे ,तोफिक मुजावर , बिटू माने ,विशाल वाघ नगरपालिकेचे आरिफ मुलाणी, नवज्योत ठोकळे, प्रशांत पारसे, भागवत राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आनंदा भाऊ माने मित्रपरिवार तसेच , काशिलिंग गाडेकर मित्रपरिवार यांनी वृक्षारोपण करण्यासाठी परिश्रम घेतले.
——————————
माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त ठेंगील आय केअर अँड व्हिजन सेंटरचे, ऑप्टो. अक्षय तू. ठेंगील व सौ. तेजस्विनी ठेंगील यांनी 3 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिरात नेत्र रुग्णांची तपासणी करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला.
——————————