सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त दि. 03 ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयातील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून
त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्याचे महान कार्य केले. तसेच आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे. या जाणीवेतून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली त्यांना पत्रीसरकार असे संबोधले जात होते. प्रतिसरकारच्या माध्यमातून नानांनी लोकन्यायालये, अन्न धान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी अनेक लोकउपयोगी कामे केली. असे विचार यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. सदाशिव देवकर यांनी मांडले.
महाविदयालयातील या कार्यक्रमाचे आयोजन आय.क्यु.ए.सी. कोऑर्डीनेटर डॉ. राम पवार यांच्या मागदर्शनाखाली डॉ. अमोल पवार व श्री. बाबासो इंगोले यांनी केले तसेच अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.