सांगोला(प्रतिनिधी):-हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक दृष्टीकोणातून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या त्यांच्या शिकवणूकीतून हिंदुप्रजापती शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी व हिंदुह्रदयसम्राट साहेब प्रतिष्ठानचे सचिव व मुख्याध्यापक अनिल बनसोडे सर यांच्या वतीने जि. प. प्रा शाळा ढाळेवाडी, खिलारवाडी, चिकमहुद, कटफळ, ईटकी व कमलापूर अशा सहा शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन शिवसेनाप्रमुखांचा व शिवसेना पक्षप्रमुखांचा सामाजिक दृष्टीकोन जपण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेळी माजी सरपंच बाळासाहेब ढाळे, शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, नवल गाडे,नानासाहेब गाडवे, महेश ढाळे, योगेश ढाळे, बाळासाहेब काळे, बाबासाब खांडेकर,बाबासाहेब ढाळे, संतोष टाकळे, आबा खरात, सचिन सुरवसे, तात्यासाहेब वाघमोडे, लिंगा मासाळ व शिवसैनिक उपस्थित होते