न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॅालेज शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची इयत्ता पाचवी ची शिक्षक पालक सभा शनिवार दि. ३ ॲागस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. या शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रा. केशव माने तर मार्गदर्शक म्हणून संस्था सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर होते.यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य प्रा.डॅा.अशोकराव शिंदे,प्रा.दिपकराव खटकाळे,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक श्री.दशरथ जाधव सर, तात्यासाहेब इमडे सर यांच्यासह सर्व पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी मयुरेश चंदनशिवे या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याची नुकतीच एमपीएससी मधून जलसंधारण विभागात निवड झाल्याबद्दल त्याचा यथोचित सन्मान संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्याप्रास्ताविकात सौ.वैशाली घोडके मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक-पालक-समाज या त्रिकूटाची महत्वाची भूमिका उपस्थितांना सांगितली.यावेळी पालकांमधून श्री व सौ.सोमनाथ राऊत,मनिषा ऐवळे,मनिषा सातपुते,विद्या ऐवळे,प्रकाश सातपुते,पांडुरंग माने,सचिन ढोले,स्वप्ना शिंदे,ताई काळे,सतिश आढारी,राजश्री नवले,दिलीप उबाळे,अंशुमन जाधव,श्री दौंडे यांनी आपल्या सूचना सांगितल्या. शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रा.केशव माने यांनी पालकांकडून आलेल्या सर्व सूचनांचे स्वागत केले व त्या सर्व सूचनांचे अंमलबजावणी करण्याचे कबूल केले.
संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर म्हणाले की,विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवुन विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांनी पाल्याचा शारिरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास सशक्त होण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. तसेच या संस्थेमध्ये शिकत असलेल्या गोरगरीब, गरजू, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ही संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक आणि पालकांच्या विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे,जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक बदल करून शैक्षणिक प्रगती साधता येईल, असे सांगितले. यावेळी प्रा.डॅा.अशोकराव शिंदे प्रा.जालिंदर टकले ,मयुरेश चंदनशिवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर,तर आभार शुभांगी बनसोडे मॅडम यांनी मानले.