विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना व कृषी प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन .

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायत निजामपूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे .
या शिबिरामध्ये विविध मान्यवरांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते .शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी मा श्री .बाळासाहेब सावंत कृषी सहाय्यक सांगोला यांचे शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना व शेती प्रक्रिया उद्योग याविषयीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचेअध्यक्ष श्रीमोहन दिगंबर कोळेकर (मा .सरपंच निजामपूर ) हे होते . यावेळी एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा . संतोष राजगुरू कार्यक्रमाधिकारी प्रा . श्रीमंत वाघमोडे प्रा . मिलिंद पवार प्रा . प्रकाश बाबर उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना मा श्री बाळासाहेब सावंत यांनी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात याविषयीची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्रे कोणती लागतात ‘ अर्ज कसा करावा , मंजुरी आल्यानंतर काय पूर्तता करावी , कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळते ‘ याविषयीची माहिती दिली .त्याचबरोबर शेती प्रक्रिया उदयोगाविषयी माहिती दिली . कोणकोणते शेती प्रक्रिया उद्योग केले जाऊ शकतात . याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन एस एस स्वयंसेवक श्रीकांत मुंजे याने केले ..या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री केशव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी प्रा .संतोष राजगुरू व सर्व एन एस एस कार्यक्रमाधिकारी . स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले