उत्कर्ष विद्यालयाची पैठण, वेरूळ व छत्रपती संभाजीनगर दर्शन सहल उत्साहात संपन्न

दिनांक 28 व 29 जानेवारी 2023 रोजी इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गांची पैठण- छत्रपती संभाजीनगर- वेरूळ दर्शन ही सहल अतिशय उत्साहात संपन्न झाली .या सहलीचा प्रारंभच ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने झाला . 28 तारखेला ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मस्थळाला म्हणजे आपेगाव या ठिकाणाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माऊलींचा इतिहास तेथील सेवेकरांच्या तोंडातून प्रत्यक्ष ऐकला .पुढे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेले धरण म्हणजे जायकवाडी धरण व त्याचा जलसाठा नाथसागर याला भेट देऊन विद्यार्थ्यांनी या धरणाची भव्यता प्रत्यक्षात पाहिली आणि तेथेच असणारे प्राचीन कालखंडातील वस्तूंचे संग्रहालय पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या भारताच्या प्राचीन समृद्ध इतिहासाची माहिती घेतली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पैठण येथे जाऊन संत एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन तेथेच विद्यार्थ्यांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला.
29 जानेवारीच्या सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील प्राचीन वेरूळच्या लेण्यांना भेट दिली. तेथील गौतम बुद्धांच्या शिल्पांना प्रत्यक्ष पाहून व स्पर्श करून विद्यार्थी अतिशय आनंदी झाले होते .यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात शेवटचे म्हणजे घृष्णेश्वर मंदिराला भेट देऊन सर्व विद्यार्थी औरंगजेबाच्या प्रथम पत्नीच्या स्मारकाला भेट देण्यास निघाले ज्या स्मारकाला बीबी का मकबरा किंवा ताजमहलची छोटी प्रतिकृती म्हणून सुद्धा ओळखतात .या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मुघलकालीन शिल्पकला कशा प्रकारची असते हे प्रत्यक्षात पाहिले आणि सर्वात शेवटी या बालचमुनी सिद्धार्थ गार्डन येथे काही वेळ मनसोक्त खेळ खेळले आणि ही सहल परतीच्या मार्गाला लागली.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे सहल.
ही सहल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पर्यवेक्षक मिसाळ सर, सहल विभाग प्रमुख प्रशांत भोसले सर ,लिंगे मॅडम ,सपताळ मॅडम, बनसोडे मॅडम ,मिसाळ मॅडम ,मुलाणी मॅडम ,देशपांडे मॅडम ,भिंगे मॅडम यांनी यशस्वी पार पाडली .या सहलीसाठी अविनाश पोफळे , ओंकार कुलकर्णी व महेश फुले यांचे विशेष सहकार्य लाभले.