रौप्य पदक विजेत्या सचिन खिलारी यांचा डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार 

करगणी ता.आटपाडी येथील सचिन सर्जेराव खिलारी याने पॅरालिम्पिक मध्ये गोळा फेक या प्रकारात भारत देशासाठी रौप्य पदक पटकावले. त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महुद येथे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सचिन खिलारीने भारताची मान उंचावली होती. सचिनचा प्रवास हा संघर्षपूर्ण होती. पण तरीही सचिनने यश मिळवलं.यश मिळवण्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो, यासाठी मेहनतीला कोणताही पर्याय नसल्याचे सांगत त्यांचे कौतुक करून भविष्यकाळात सुवर्णपदक मिळवून देशाचा नावलौकिक करावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.

सचिन खिलारी हा ४० वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या सचिन खिलारी याने इतिहास रचला आहे. सचिनने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button