फॅबटेक पॉलिटेक्निक च्या 17 विद्यार्थ्यांची टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये निवड
सांगोला – गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू झालेल्या सांगोला येथील फॅबटेक इन्स्टिट्यूटने डिप्लोमा इंजिनिअरिंगक्षेत्रात गुणवत्तेच्या बाबतीत आपला नावलोकिक निर्माण केला आहे.कमी कालावधीत शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवणे किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिप्लोमा प्रवेश घेणे हे केव्हाही सोयीस्कर ठरते आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे या वर्षी फॅबटेक मधून डिप्लोमाच्या 17 विद्यार्थ्यांची कॅम्पस द्वारे टाटा इलेक्ट्रॉनिक्स या तामिळनाडू मधील हसुर येथील कंपनीत निवड झाली आहे.या मध्ये 13 विद्यार्थी हे इलेक्ट्रॉनिक्स विभागातील व चार विद्यार्थी मेकॅनिकल विभागातील आहेत.विशेष म्हणजे यात सात मुलींचा समावेश आहे.
या कॅम्पस ड्राइव्ह द्वारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन मधील सुजाता बंडगर, स्नेहल पाटील, शिवानी शिंदे, तनिष्का ताटे, संध्या कुंभार ,दिक्षा मेटकरी आरती नलवडे, शुभम गिरी ,अधिकराव गडदे, यशराज मेटकरी, रणजित बागल, योगेश पवार , अजय रणवीर तसेच मेकॅनिकल विभागातील श्रियश ढोले, मयुर आतकर, अजित मासाळ व प्रथमेश आलदर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागण्याआधीच व डिप्लोमा पूर्ण होण्याअगोदरच निवड झाली असून 2.80, लाख पॅकेज प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे समन्वयक प्रा.तन्मय ठोंबरे व प्रा. राहुल काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर , मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रूपनर , कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर , कँपस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले ,मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. महेश वाळुजकर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. .
इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांनी कमी वेळेत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मार्ग म्हणून डिप्लोमा शिक्षणाकडे पहावे, व फॅबटेक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यावा,असे आवाहन भाऊसाहेब रूपनर यांनी केले आहे.