मांजरी विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न

मांजरी(वार्ताहर):- रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल मांजरी विद्यालयात भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या) यांच्या 17 व्या स्मृतीदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. सरपंच भाऊसाहेब जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती मनोज लेंडवे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कृष्णा इंगोले हे होते.या कार्यक्रमाला दत्तात्रय हराळे,नारायण जगताप ,अतुल रामदासी , विजयकुमार खंडागळे ,अमोल लेंडवे व सौ.सरिकाताई घाडगे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कर्मवीर भाऊराव पाटील(अण्णा) व भाई जगन्नाथराव लिगाडे(तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केदार आर.बी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेर्याची गरज नमूद केली.यावेळी सीसीटीव्ही कॅमेर्यासाठी विद्यालयाला नेहमी सहकार्य करणारे उद्योगपती श्री.मनोज लेंडवे यांनी रोख 21000 रुपये तर मांजरी गावचे माजी सरपंच श्री.भाऊसाहेब जगताप यांनी रोख 5000 रुपये देणगी दिली.
विद्यालयात भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या) चॅरिटेबल ट्रस्ट अकोला(वा.)यांचे वतीने रयत शिक्षण संस्था सातारा यांचेकडे ठेवलेल्या रू. 50000च्या व्याजातून साध्वी राधाक्का यांचे नावाने विद्यालयात प्रत्येक इयत्तेत प्रथम तीन क्रमांकाच्या मुलींना रोख रक्कम व चंदन ग्रंथ बक्षीस स्वरूपात देण्यात आले.बक्षीस वितरणाचे काम श्री.लवांडे डी.पी.यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन श्री. बनसोडे एस.बी.यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.पवार डी. डी.यांनी केले