विजेचे शॉक लागून म्हैस ठार; सांगोला तालुक्यातील घटना

सांगोला:- सांगोल्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. शहरात दुपारी हलका तर रात्री 8 वाजलेनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.वादळी वारे व पावसामुळे सांगोला तालुक्यातील नाझरे सह अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सांगोला तालुक्यातील सरगरवाडी येथे दि.19/8/2024 रोजीच्या वादळी वारे व पावसामुळे विजेचे शॉक लागून श्री. सिकंदर मौला नदाफ यांची म्हसीचा मृत्यू झाला.त्याचप्रमाणे मौजे- सरगरवाडी येथे रोजीच्या वादळी वारे व पावसामुळे श्री. विजयकुमार जाविर यांचे जनावराच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.तसेच मौजे- नाझरे येथे वादळी वारे व पावसामुळे श्री.रामचंद्र निवृत्ती आडसुळ यांचे राहत्या घरावर व टेम्पो या वाहनावर झाड पडून नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.