सांगोला :शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाकी घेरडी येथील शिवसेना (उबाठा गट) गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे वाकी घेरडी भागातून दिपक आबांना मोठा धक्का समजला जात आहे.
वाकी घेरडी येथील श्री.भाऊसो पवार, श्री.रेवण्णा खांडेकर ,श्री.शरद सांगोलकर ,श्री.भारत सांगोलकर ,श्री.दादा दिवसे ,श्री.महादेव दिवसे ,श्री.शिवण्णा दिवसे, श्री.धनाजी दिवसे,श्री.दिगंबर येडवे , श्री.मारुती गुजले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.