यलमर मंगेवाडी येथे 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ
सांगोला :- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यलमर मंगेवाडी ता.सांगोला येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत शंभर दिवशीय क्षयरोग टीबी शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच बापू जावीर, कुंडलिक येलपले, राजाराम कोकरे, सत्यवान घाटुळे, अक्षय पाटील, अक्षय काटे, शांतीकुमार लोखंडे, प्राथमिक शिक्षिका सुवर्ण सावंत, शुभांगी चौरे, अंगणवाडी सेविका अनुसया घाटुळे आरोग्य सेवक संजय वाघमारे यांची उपस्थिती होती.
आरोग्य सेवक संजय वाघमारे यांनी मोहिमेविषयी माहिती सांगितली. सी.वाय.टी.बी स्किन टेस्ट तपासणी करून पॉझिटिव्ह येणार्या व्यक्तींना टी पी टी चालू करण्यात येणार आहे, प्रतिबंधात्मक औषधे दिली जाणार आहेत. क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र यांच्याकडून मोफत पोषण आहार किट वाटप केले जाणार आहे. डी.बी.एस.टी योजनेअंतर्गत उपचार काळात रुग्णांना प्रत्येक महिन्याला 1000 दिले जाणार आहेत.
साठ वर्षावरील व्यक्ती, एच आय व्ही पेशंट, मधुमेह पेशंट, व्यसने करणार्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या संपर्कातील घरातील व्यक्ती, अगोदर उपचार घेतलेले टी. बी. रुग्ण, बी.एम आय 18 पेक्षा कमी असणार्या व्यक्ती, झोपडपट्टी, कारखाने, अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी क्षय रुग्णांना शोधले जाणार आहे. क्षयरोग मुक्त गाव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.