हरिकल्प फाउंडेशन संचलित एकलव्य कोचिंग क्लासेस व फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने विज्ञान प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
नाझरे (वार्ताहर):नाझरे येथे हरिकल्प फाउंडेशन संचलित एकलव्य कोचिंग क्लासेस व फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल नाझरे यांचेवतीने आयोजीत विज्ञान प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विविध बाह्य शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये कन्या प्रशाला नाझरे, नाझरा विद्यामंदिर नाझरा, सांगोला विद्यामंदिर सांगोला, न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी आदी शाळांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला होता.
तसेच कार्यक्रमाला पर्यवेक्षक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे श्रीमान करिअर अकॅडमीचे संस्थापक श्री निकम सर तसेच संजय क्लिनीकल लॅबोरेटरी चे सोमनाथ आदलिंगे, तसेच हलदहिवडी विद्यालय हलदहिवडीचे प्रा.श्री.एम.के.काझी सर, तसेच फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन सौ.ऐश्वर्या कन्हैया सोनवणे उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री गव्हाणे सर यांनी तर आभार डॉ.कन्हैया सोनवणे यांनी केले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ सोनाली सरगर मॅडम, सौ शुभांगी रायपुरे, सौ सीमा स्वामी, कु.भंडारे मॅडम, श्री राऊत सर यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचा गुणगौरव सोहळा 22 डिसेंबर 2024 रोजी होणार्या अविष्कार 2024 मध्ये वसंत हंकारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.