जवळे प्रशालेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
जवळे वार्ताहर. कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत भारतरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे व प्राध्यापक श्री.सुरेश गावडे यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे खूप वाचन करून अभ्यासू विद्यार्थी बनण्याचा संकल्प करावा हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर पंचशीलाचे पालन केल्यामुळे त्यांच्या हातून सर्व कार्य यशस्वी आणि अजरामर झाली.विद्यार्थ्यांनी पंचशिलाचे पालन केल्यास त्यांना बुद्धी सम्राट होता येते.हा संकल्प विद्यार्थी विद्यार्थिनींनी करावा. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फुले वाहून अभिवादन केले.