सांगोला (प्रतिनिधी) : येथील सांगोला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय सांगोला, यांच्या वतीने शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी एच.आय.व्ही./ एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांच्या मार्गदर्शनानुसार हा कायक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
रेड रिबन क्लब ही भारत सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू केलेली एक चळवळ आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही./ एड्सबद्दल जनजागृती केली जाते. नियमित ऐच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देऊन निरोगी जिवनशैली विकसित करण्यासाठी, रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले जाते. जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहनिमित्त सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिराम सर, पंढरपूर एआरटी सेंटरचे वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सयाजीराव गायकवाड सर सोलापूर जिल्हा एडस नियंत्रण सोसायटी चे प्रोग्राम अधिकारी श्री. भगवान भुसारी सर यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला महाविद्यालय रेड रिबीन क्लब आय.सी.टी.सी. सांगोला येथे HIV AIDS या विषयावर जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामीण रूग्णालय सांगोला आय.सी.टी.सी. समुपदेशक श्री. नागेश दोशट्टी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. मोहन घाडगे तसेच लिंक वर्कर श्री. रणजित जाधव यांच्या सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.अर्जुन मासाळ, डॉ.प्रकाश पाटील, डॉ.रमेश टेंभूर्णे प्रा.वासुदेव वलेकर, डॉ.रमेश बुगड, डॉ.विद्या जाधव, प्रा.ओंकार घाडगे या प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे, डॉ.सदाशिव देवकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.