शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा कोणाला असणार? आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले…
आबासाहेबांनी (दिवंगत गणपतराव देशमुख) 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केले. त्याच विचारांचा मी आहे म्हणून मला निवडणून दिल्याचे बाबासाहेब देशमुख म्हणाले. आता आनंद आहे पण आबासाहेब बघायला नाही ही खंत असल्याचे ते म्हणाले. जनतेची कामं आणि तालुक्याचा विकास हाच अजेंडा असल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्ष हा कॅडर बेस पार्टी आहे. कोणासोबत जायचे याबाबतची निर्णय जयंत पाटील आणि केडर ठरवेल असेही असे सांगत भाई जयंत पाटील परगावी आहे म्हणून चर्चा नाही झाली असेही देशमुख म्हणाले.
मारकडवाडीच्या मुद्यावर देखील आमदार बाबासाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच नेतेमंडळींनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. जनतेची अपेक्षा आणि म्हणणं अधिकाऱ्यांनी ऐकूण घ्यायला हवं असंही बाबासाहेब देशमुख म्हणाले.
आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी केली नवीन उपक्रमाची घोषणा
बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होताच, ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले आहेत. दरम्यान, बाबासाहेब देशमुख यांनी सुरु केलेल्या या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षणाची चळवळ वाढवण्याचे काम यामाध्यमातून केलं जाणार आहे.