जवळे ग्रामपंचायत कार्यालयात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा संपन्न.

जवळे(प्रशांत चव्हाण) जवळे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा रवि.दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी सभापती मा.साहेबराव दादा पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सदर कार्यक्रमांमध्ये मंडल कृषी अधिकारी श्री अण्णासाहेब पासले यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली. व कृषी विभाग सातत्याने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले.त्याचबरोबर कृषी सहाय्यक श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी कृषी विभागाच्या योजना सविस्तर सांगितल्या यामध्ये ठिबक सिंचन, शेततळे, पीएम किसान योजना या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेबराव दादा पाटील यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी दुष्काळामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या उपाययोजना सांगितल्या व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक प्रतीक डुबल यांनी मानले. शेतकऱ्यांनी इ केवायसी व आधार सिडिंग करून घ्यावे व पी एम किसान योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक श्री जाधव साहेब श्री खरात साहेब, श्री नागेश सरगर त्याचबरोबर माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,शेतकरी बांधव उपस्थित होते त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.