शाहीर सुभाष गोरे स्टार इंडियन अवॉर्डने सन्मानित

सांगोला:- दिनांक 21/ 7 /2024 रोजी पुणे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येरवडा पुणे येथे भारतीय महाक्रांती सेना यांच्या वतीने दिला जाणारा सांस्कृतिक कलाक्षेत्रातील स्टार इंडियन अवॉर्ड देऊन शाहीर सुभाष गोरे यांना उद्योगपती माननीय चुनावाला निकिता तुले एपीआय पुणे आयुक्त चित्रपट अभिनेत्री गोस्वामी अविनाश सरकुंडे संतोष विरकर संयोजक आदी मान्यवरांच्या हस्ते स्टार इंडियन अवॉर्ड व युवा महाराष्ट्र फाउंडेशन चा महाराष्ट्र गौरव असे एकाच दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त दोन पुरस्कार देऊन शाहीर गोरे यांना सन्मानित करण्यात आले
या अगोदर शाहीर गोरे यांना सांस्कृतिक कलाक्षेत्रातील कलाभूषण, आदर्श शाहीर, कलारत्न, जीवनगौरव, आदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत सांस्कृतिक कलाक्षेत्रात शाहीर गोरे यांनी दिल्ली, कलकत्ता, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, नागपूर, कर्नाटक, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक कार्य संचालनालय सचिवालय मुंबई, शाहिरी महोत्सव, विविध कला महोत्सव, महासंस्कृती महोत्सव, सूचना व प्रसारण मंत्रालय दिल्ली, माहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई, आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे
आपल्या लोककलेचे सादरीकरण करून लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम केले आहे व करीत आहे लोककलावंतासाठी सामाजिक कार्य म्हणून शाहीर गोरे यांनी मेळावा, स्पर्धात्मक कला महोत्सव, उपोषण, आंदोलन, कलावंतांची शिबिरे, सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई शाहिरी शिबिर, कला महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले आहेत कलावंतांच्या न्याय हक्कासाठी कायम प्रयत्नशील राहिले आहेत मानाचा समजला जाणारा स्टार इंडियन अवॉर्ड व महाराष्ट्र गौरव पुरस्कार शाहीर गोरे यांना मिळाल्याने जिल्ह्यातून तालुक्यातून कलावंत, ग्रामपंचायत जवळा, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, यांनी शुभेच्छा दिल्या जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे