महाराष्ट्र

श्रीमती सुनिता शेटे गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित

महावितरणच्या तांत्रिक विभागात काम करीत असताना विना अपघात सेवा, सुरळीत वीज सेवा, रोहि त्र काळजी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे व कामाच्या ठिकाणची देखभाल इत्यादी क्षेत्रात कर्तव्यदक्षता, निष्ठा व श्रम दाखवून श्रीमती सुनिता भारत शेटे यांनी दाखवून दिलेल्या कार्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना तांत्रिक कामगार पुरस्काराने ऊर्जा भवन बारामती येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बारामती परिमंडळ येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

बारामती मंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, उपमुख्य अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, मुख्य व्यवस्थापक धैर्य शील गायकवाड, सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील माने, पंढरपूर महावितरण कार्य. अभियंता विजय पाटील इ. च्या शुभ हस्ते श्रीमती सुनिता भारत शेटे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. अकलूज महावितरण अभियंता आण्‍णासो काळे, स्वानंद शिंदे, अभियंता हनुमंत बनसोडे, यशवंत दिघे, राजश्री खरात, स्वप्निल शेटे, सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व सांगोला तालुका वर्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सदरच्या पुरस्काराबद्दल श्रीमती सुनिता शेटे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button