सांगोला तालुका

कामटे संघटनेच्या मागणीनुसार सांगोला येथे रेल्वे विभागाची फेर आढावा बैठक संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोल्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भर असल्याचे प्रतिपादन शहीद अशोक कामटे  संघटनेच्या प्रतिनिधींनी या रेल्वे प्रश्नांच्या बुधवारी फेरआढावा बैठकीत व्यक्त केले .

शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय  संघटनेच्यावतीने प्रवाशांच्या व नागरिकांच्या समस्या संदर्भात सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयास निवेदन देण्यात आले होते. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रवाशांच्या समस्या व रेल्वे संदर्भातील समस्या वारंवार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करीत आहे .या पुढील काळातदेखील कामटे संघटना विविध मागण्यांकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन नीलकंठ शिंदे सर यांनी यावेळी केले.

मध्य रेल्वे विभागातील कार्यालयात  संबंधित अधिकारी ,  अभियंता डी एम मौर्य ,गणेश वाळके (इंजिनिअरिंग) , रेल्वे गुप्त शाखेचे  निरीक्षक इर्शाद शेख यांनी समस्या संदर्भात मीटिंग घेऊन सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले.

मिरज रेल्वे गेट क्रमांक 32 भुयारी मार्गात पाणी साठत असल्याने सदरचा प्रश्न नगरपालिका सांगोला व रेल्वे विभाग यांच्या समन्वयाने कार्यवाही करून सोडविणार आहेत. या परिसरातील पाणी पाझरत असल्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे नगरपालिकेचे व येथील बाजूला असणार्‍या ओढ्यातील बंधार्‍यामुळे येथील जमीन सखल भागात पाणी मुरत असल्याने ते पाणी पाझरून सर्व ब्रिज मध्ये उतरत आहे ,त्याठिकाणी 6 इंचाचे काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकार्‍यांनी संबंधितांना दिल्या. आवश्यक त्या उपाय योजना  करून व महूद रेल्वे गेट क्रमांक 31 बी येथीलही मजबूत काँक्रिटीकरण करून येथील समस्याचे निराकरण तात्काळ करावे, अशा सूचना रेल्वे विभागाचे अभियंता ढवळे यांनी दिली. प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला.

त्याचबरोबर मैसूर -पंढरपूर रेल्वेचा विस्तार सांगोला पर्यंत करणे, सांगोल्यातून थेट मुंबईकरिता रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न व विभागीय रेल्वे  व्यवस्थापक सोलापूर यांनी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा सुरू असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. कोल्हापूर- कलबुर्गी- कोल्हापूर थांबा लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले ,त्याकरिताचा अहवाल देखील सोलापूर येथील रेल्वे विभागाने सकारात्मक महा व्यवस्थापक कार्यालय मुंबई यांना पाठवल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी शहीद कामटे संघटनेचे प्रा .प्रसाद खडतरे, तोसिफ शेख, मकरंद पाटील सदस्य व पदाधिकारी मीटिंग वेळेस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!